ठाणे, 19 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून ठाणे शहरात अतिक्रमणावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आवाज उठवत आहेत. दरम्यान त्यांनी पुन्हा ठाणे शहरातील वाय जंक्शनवर सुरू असलेल्या कामावरून आक्षेप घेतला आहे. राज्यसरकारची जागा काही बिल्डर बळकावत असल्याची बाब आव्हाड यांनी समोर आणली आहे.
राज्य सरकारची जागा असुन देखील महापालिकेचे अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. यावरून त्यांनी सरकारला आणि अधिकाऱ्यांना ठाणे विकायला काढले आहे का असा सवाल केला आहे.
हे ही वाचा : पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या हात जोडून…
आव्हाड म्हणाले की, शहरामध्ये वाय जंक्शन कौसा येथील ब्रिज उतरल्या उतरल्या MMRDA ने आपल्या रस्त्यासाठी काही बिल्डींग निष्कासित केल्या होत्या. सदरची जागा ही महाराष्ट्र शासनाची असून नगरसेवकांनी अनेकवेळा तक्रारी करुन देखील महानगरपालिकेचे मुजोर अधिकारी त्याच्यावर कारवाई करु इच्छित नसल्याचे आव्हाड यांनी सांगितलं.
हे ही वाचा :
href=“https://lokmat.news18.com/maharashtra/wardha/mahavikas-aghadi-announcement-of-5-candidates-for-padavidhar-legislative-council-from-mahavikas-aghadi-mhsr-816717.html">नाशिकसह 5 विधानपरिषदेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर, तांबेंची हकालपट्टी
तसेच शहरामध्ये वाय जंक्शन कौसा येथील ब्रिज उतरल्या उतरल्या MMRDA 500 रु. स्क्वे. फूट चा रेट जर अधिकाऱ्यांना मिळणार असेल, तर मग ठाणेच विकायला काढलेलं बर आयुक्त महोदय यावर कारवाई कराल अशी अपेक्षा. रस्त्यावरच कामकाज चालू आहे. त्यामुळे अॅ्ड्रेस द्यायला नको. (शिबली नगर)