JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / indore bus accident : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, शिंदे सरकारची घोषणा, 15 मृतांपैकी 7 जणांची ओळख पडली

indore bus accident : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, शिंदे सरकारची घोषणा, 15 मृतांपैकी 7 जणांची ओळख पडली

या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी

जाहिरात

या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै :  मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली आहे.  या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही 20 ते 25 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.  या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आज सकाळी इंदूर येथून अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच  एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील  सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.  या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे. अपघातातील 7 जणांची ओळख पटली 1.चेतन राम गोपाल जांगीड, (राहणार, नांगल कला गोविंदगढ जयपूर राजस्थान) 2.जगन्नाथ हेमराज जोशी  (वय 70, मल्हारगढ, उदयपूर, राजस्थान) 3.प्रकाश श्रवण चौधरी (बस वाहक, वय 40, शारदा कॉलोनी अमळनेर, जळगाव महाराष्ट्र) 4.निबाजी आनंदा पाटील, (वय 60, राहणार अमळनेर) 5**.चंद्रकांत  एकनाथ पाटील, (बस चालक, वय 45, राहणार अमळनेर जळगाव** 6**. अरवा मुर्तजा बोहरी (वय 27 राहणार, मूर्तिजापूर अकोला महाराष्ट्र)** 7**.सैफुद्दीन अब्बास निवासी, (नूरानी नगर इंदूर)**

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या