मुंबई 25 डिसेंबर : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्यता आहे वेधशाळेनं व्यक्त केलाय. महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण ही राहील, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसच स्थानिक वातावरण यामुळ ढगाळ वातावरण राहील असं कुलाबा वेधशाळेन म्हटले आहे. आधीच महिनेभर उशीराने थंडीचं आगमन झालंय. राज्यात आत्ता कुठे थंडीचा जोर वाढत आहे. सगळ्यांना थंडीची प्रतिक्षा असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असल्याने थंडीचा जोर ओसरणार असा अंदाज आहे. चांगली थंडी पडली तर त्याचा हरभरा, गहू आणि इतर काही पिकांना फायदा होतो. चांगली थंडी नसेल तर त्याचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. मोसमी पाऊस राज्यातून परतल्यानंतर अवकाळी पावसाचं आगमन झालं. सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. दरवर्षी या काळात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पारा चांगलाच खाली येतो. सध्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असल्याने त्याचाही परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार होतोय. काश्मीरप्रमाणेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेतल्या थंडीचं प्रमाणही वाढणार वाढण्याची शक्यता होती.
मान्सूनचं हे परत जाणं तब्बल एक महिन्याने लांबल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. सुरुवातीला थोडा रखडणारा मान्सूनने नंतर सर्व राज्यभर प्रचंड धुमाकूळ घातला होता. तर काही भागाकडे पाठ फिरवली. मात्र कोल्हापूर, पुणे आणि मुंबईत गेल्या काही दशकांमधला हा सर्वात जास्त पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं.