JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ऑनलाईन जेवण ऑर्डर केली असेल तर या 6 गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही कोरोना

ऑनलाईन जेवण ऑर्डर केली असेल तर या 6 गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही कोरोना

मुंबई 16 मे : लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. अनेक लोक अडकून पडले आहेत. सगळ्यात अडचण होतेय ती लोकांच्या जेणाची. हॉटेल बंद असल्याने जेवायचं तरी कुठे असा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. ऑनलाईन ऑडर्सला परवानगी आहे. त्यामुळे लोक ऑनलाईन ऑर्डर द्यायला पसंती देत आहे. मात्र त्यासाठी काही काळजी घेणे गरजेची असून ती काळजी घेतली तर कोरोनाचा धोका टाळता येणार आहे.ही काळजी घेत असतानाच तुम्ही कायम घराच्या स्वच्छतेची आणि स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 मे : लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. अनेक लोक अडकून पडले आहेत. सगळ्यात अडचण होतेय ती लोकांच्या जेणाची. हॉटेल बंद असल्याने जेवायचं तरी कुठे असा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. ऑनलाईन ऑडर्सला परवानगी आहे. त्यामुळे लोक ऑनलाईन ऑर्डर द्यायला पसंती देत आहे. मात्र त्यासाठी काही काळजी घेणे गरजेची असून ती काळजी घेतली तर कोरोनाचा धोका टाळता येणार आहे.ही काळजी घेत असतानाच तुम्ही कायम घराच्या स्वच्छतेची आणि स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हायजिन रेटिंग चेक करा – कुठल्याही ब्रँडची ऑर्डर देतांना त्यांच्या App वर जाऊन त्यांचे हायजिन रेटिंग चेक करा. कारण सध्याच्या काळात हायजिन अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस – करोनाचा प्रसार होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त लोकांचा संपर्क येणं. त्यामुळे ऑर्डर करतांना अशी सर्व्हिस असलेल्या कंपनीकडूनच तुम्ही वस्तू खरेदी केली पाहिजे किंवा जेवणारी ऑर्डर दिली पाहिजे. ऑर्डर मिळाल्यानंतर काय कराल – ऑर्डर मिळाल्यानंतर सर्वात आधी बॉक्स ठेवलेली जागा स्वच्छ करा. त्यानंतर ताबडतोब पॅकिंग बॉक्स काढा आणि ती वस्तू तुमच्या स्वच्छ भांड्यांत ठेवा. ते सगळं केल्यानंतर ओटा स्वच्छ पुसून घ्या. हात धुण्यास विसरू नका – तुम्ही स्पर्श करणाऱ्या वस्तूंवर व्हायरस असण्याची शक्यता असते. त्यामुळे हात साबणाने स्वच्छ करा. किमान २० सेकंद हात धुतलेत पाहिजेत. सगळ्या जागा स्वच्छ करा – बेलचं बटण, दरवाज्याची कडी, स्वयंपाकाचा ओटा या जागा वारंवार स्वच्छ करा. जेवण गरम करा – ऑर्डर आल्यानंतर ती गरम असली तरी तुम्ही स्वच्छ भांड्यात ते अन्न पुन्हा एकदा गरम केलंच पाहिजे. म्हणजे ते जास्त सुरक्षीत राहतं. हे वाचा - कोरोनाच्या संकटात रुग्णालयांची अवस्था बिकट, नोकरी सोडून नर्स जात आहेत घरी कोरोनाचं थैमान! राज्यात एका दिवसात आढळले 2347 रुग्ण, ही आहे लेटेस्ट आकडेवारी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या