JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आता गृहमंत्र्यांचाही राजीनामा? परमवीर सिंहांच्या खळबळजनक पत्रामुळे भाजप आक्रमक

आता गृहमंत्र्यांचाही राजीनामा? परमवीर सिंहांच्या खळबळजनक पत्रामुळे भाजप आक्रमक

परमवीर सिंहांच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च : मनसूख हिरेन प्रकरणावरुन आधीच ठाकरे सरकारवर घेराव घातला जात असताना आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केला आहेत. सध्या व्हायरल झालेल्या पत्रातील सातव्या मुद्द्यानुसार गृहमंत्र्यांनी वाझे आणि परमवीर सिंह यांना महिन्यांच टार्गेट दिलं होतं. हे कथित पत्र व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. (BJP is aggressive due to Paramvir Singhs letter ) सध्या भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही सोशल मीडियावर ठाकरे सरकारवर टीका केली आहे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. त्यांनी ट्वीमध्ये म्हटलं आहे की, वाझे हे ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा आरोप आता सिद्ध झाला आहे. (BJP is aggressive due to Paramvir Singhs letter )

अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला आहे. या पत्रानंतर आता भाजप आक्रमक झाली असून मुख्यमंत्री वाझेची पाठराखण करीत असल्याचा आरोप केला आहे. परमवीर सिंह यांच्या खळबळजनक पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन हा आरोप खोटा असल्याचं जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

परमवीर सिंह यांच्या पत्रानंतर आता गृहमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागणार का? हे लवकरच समोर येईल. या पत्राबाबत अद्याप परमवीर सिंह यांनी माध्यमांसमोर येऊन काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या