JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Holi 2023: मुंबईत रंगपंचमीला ‘इथं’ करा आकर्षक टी शर्टची खरेदी, पाहा काय आहे ट्रेंड Video

Holi 2023: मुंबईत रंगपंचमीला ‘इथं’ करा आकर्षक टी शर्टची खरेदी, पाहा काय आहे ट्रेंड Video

Holi 2023 Updates: मार्केटमध्ये यावर्षी रंगपंचमीनिमित्तानं टी शर्टमध्ये एक नवा ट्रेंड आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नुपूर पाटील, प्रतिनिधी  मुंबई, 4 मार्च :  रंगपंचमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने होळी व रंगपंचमीचे नियोजन करत आहे. यातलच एक महत्वाचं नियोजन असतं ते म्हणजे रंगपंचमीला कोणता ड्रेस घालावा? रंगपंचमीला अनेक जण वेगवेगळ्या थीम प्रमाणे ड्रेस घालत असतात. कोणी ग्रुपची थीम बनवत तर कोणी सोसायटीची थीम बनवतं. तुम्ही सुद्धा थीम तयार केली असेल तर आम्ही तुम्हाला टी शर्ट्स खरेदीचा  मुंबईतील  बेस्ट ऑप्शन सांगणार आहोत. रंगपंचमीच्या निमित्ताने अनेकजण नाच-गाणे आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा तसेच विविध कार्यक्रम करत असतात. प्रत्येकालाच वाटतं की आपण काहीतरी नवीन करावं. यासाठीच मुंबईच्या दादर मार्केटमध्ये यावर्षी रंगपंचमीनिमित्तानं टी शर्टमध्ये एक नवा ट्रेंड आला आहे. पांढऱ्या रंगाच्या टी शर्टवर विविध रंगी छटा आणि त्यावर, होली हैं भाई होली हैं, रंग बरसे, बुरा ना मानो होली हैं अश्या विविध प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. किती रुपयांना आहेत हे टी शर्ट्स? या टी शर्ट्सची किंमत साईझनुसार वेगवेगळी आहे. तसेच हे टी शर्ट्स वॉटर प्रूफ कपडयाने बनवले आहेत. स्पेशल पाण्यात वापरण्यासाठी या टी शर्ट्सला पसंती असते. 70 रुपये ते 200 रुपयांच्या आत हे टी शर्ट्स मिळतात. येथे फक्त होलसेल पद्धतीने टी शर्ट्स विकले जातात म्हणून पूर्ण बंडल खरेदी करावा लागतो. विविध प्रकारचे टी शर्ट्स या ठिकाणी विविध भागातून लोकं खरेदी करण्यासाठी येतात. तसंच पांढरे कुर्ते सुद्धा विकले जातात. ग्रुपप्रमाणे आपापली थीम निवडून टी शर्ट्स खरेदी करतात. या मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लहानग्यांपासून मोठ्यांसाठीचे टी शर्ट्स तुम्हाला मिळतील. विविध प्रकारचे टी शर्ट्स पाहायला मिळतील, असं विक्रेता संदिप जैन यांनी सांगितलं.

गूगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

कुठे खरेदी करू शकता? दादर स्थानकाच्या पश्चिम परिसरात विविध दुकाने आहेत या ठिकाणी तुम्ही खदेरी करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या