JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यातील 24 तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील 24 तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

तुमच्या भागात कसं असेल तापमान, पाऊस पडणार का? जाणून घ्या सविस्तर.

जाहिरात

पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून: राज्यात मान्सून दाखल झाला असला तरीही अनेक भागांमध्ये अद्यापही पावसानं जोर धरला नाही. तर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग, बीड, जालना, नांदेड बुलढाणा, लातूर इथे आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल. येत्या चौवीस तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पाऊस राहील, या आधी पेक्षा तूर्तास पावसाचा जोर कमी राहिल, पूर्व विदर्भात ही पुढील 24 तासात पाऊस राहिल असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. मुंबईत मागील दोन दिवस आधी जितक्या जोरात पाऊस झाला त्यातुलनेन पाऊस कमी राहिल असंही म्हटलं आहे. हिंगोलीमध्ये शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला. तर पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात बैलगाडी वाहून गेली यामध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हे वाचा- भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार ‘हे’ औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार हे वाचा- धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड, उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यू संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या