JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यपालांकडून ठाकरे सरकारच्या 'या' कामाचं तोंडभरून कौतुक

राज्यपालांकडून ठाकरे सरकारच्या 'या' कामाचं तोंडभरून कौतुक

Governor Bhagat Singh Koshyari Praises Thackeray Government : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या या योजनेचं कौतुक केलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (State Budget Session) सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने झाली. ‘राज्यातील सर्व कुटुंबाचे दोन फेऱ्यांमध्ये आरोग्य सर्वेक्षण करणारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही देशातील अभिनव आरोग्य तपासणी मोहीम राज्यात राबवण्यात आली. या मोहिमेमुळे राज्यातील कोविड संसर्ग रुग्ण सापडण्याबरोबरच राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत झाली,’ असं म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या या योजनेचं कौतुक (Governor Bhagat Singh Koshyari Praises Thackeray Government) केलं. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठीतून संपूर्ण अभिभाषण केलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नरही झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार उपस्थित होते. ठाकरे सरकारच्या योजनेचं कौतुक करताना काय म्हणाले राज्यपाल? राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत राज्यातील अतिजोखमीच्या व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांचे विशेष सर्वेक्षण देखील करण्यात आलं आहे. राज्यात कोविडचा धोका अजूनही टळलेला नसून आता कोविडशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासनामार्फत “मी जबाबदार” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने कोविडचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्या अन्य राज्यांसाठी आणि अन्य देशांसाठी आदर्श ठरल्या आहेत, अशा शब्दांत राज्यपालांनी सरकारच्या योजनेवर स्तुतीसुमने उधळली. हेही वाचा - दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद, भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिली मोठी जबाबदारी ‘सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी करून आणि धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये यशस्वीपणे कामगिरी करून राज्याचे या साथ रोगाचे अत्यंत प्रभावी व्यवस्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता आपण सर्वांनीच सुरक्षित अंतराचे पालन करण्याची, मुखपट्टयांचा वापर करण्याची आणि नियमितपणे हात धुण्याची तीव्र गरज आहे,’ असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या