JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सुशांत आत्महत्या प्रकरण, रियाच्या चौकशीत 10 तासांमध्ये काय घडलं? EXCLUSIVE माहिती समोर

सुशांत आत्महत्या प्रकरण, रियाच्या चौकशीत 10 तासांमध्ये काय घडलं? EXCLUSIVE माहिती समोर

रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली आणि बांद्रा पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मुंबई शहरात 14 जूनला देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. मात्र त्याच्या आत्महत्येमागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात असून त्यानुसार मुंबई पोलिसांनी सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी केली सुरू केली आहे. पोलीस चौकशीत सर्वात महत्वाचे नाव आहे, ते म्हणजे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचं. गुरुवारी 18 जूनला सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली आणि बांद्रा पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान रियाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. चौकशीचा संपूर्ण तपशील : पोलीस अधिकारी : आपलं पूर्ण नाव?  रिया : रिया इंद्रजीत चक्रवर्ती … पोलीस अधिकारी : तुमच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा?  रिया : माझा जन्म बेंगळूरू येथे झाला… माझे शालेय शिक्षण पंजाब मिलेट्री कॅंटमध्ये झाले… कारण माझे वडील सैन्यदलात अधिकार पदावर होते… मला एक लहान भाऊ आहे…  पोलीस अधिकारी : तुम्ही मुंबईत कसे आलात? रिया : सुरुवातीला मी मॉडलिंग करायची नंतर काही टिव्ही अॅड आणि रियालिटी शो केले… त्यानंतर मला तुनिंगा तुनिंगा या तेलगू सिनेमात काम मिळालं… तिथून पुढे “मेरे डॅड की मारुती” या पहिल्या हिंदी सिनेमात मला महत्वाचा रोल मिळाला… शुटिंगमुळे मी मुंबईतच राहायची… याच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान 2013 साली माझी सिद्धार्थसिंग राजपूत यांच्याशी भेट झाला. त्यावेळी सुशांत सिंह राजपूत सुप्रसिद्ध शुद्घ देशी रोमांस सिनेमा करत होता… आणि मी ‘मेरे डॅडी की मारुती’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती… दोन्ही चित्रपटाचे सेट जवळपास होते… आणि तिथेच आमची पहिली भेट झाली… आम्ही वेगवेगळ्या फिल्म सेटवर आणि नंतर पार्टीत भेटत राहिलो आम्ही मित्र झालो आणि आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले… आम्ही भेटतच होतो, पण त्यावेळी सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता … पोलीस अधिकारी : 2017-2018 मध्ये तुम्ही आणि सुशांत एकाच प्रॉडक्शन हाऊस मधून वेगळे झाला?  रिया : हो आम्ही एकमेकांशी संपर्कात होतो आणि नंतर सन 2017-2018 मध्ये आम्ही एकाच प्रॉडक्शन हाऊसपासून वेगळे होवून स्वतंत्र होण्यासाठी आणि वेगवेगळ्या बॅनरखाली काम करण्याचा निर्णयही घेतला …. नंतर आम्हा दोघांमध्ये रिलेशनशिप झाले…  पोलीस अधिकारी : सुशांत नैराश्यात होता?  रिया : हो, सुशांत त्याच्या अंतर्गत समस्यांशी झगडत होता … त्याने कधीच काहीही शेअर केले नाही … संकटामध्ये एकटे रहायचे किंवा लांब पुण्याच्या पवना येथील फार्म हाऊस मध्ये जायचे… त्याची वाढती नैराश्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला आणि तेथून औषधे सुरू केली … पण त्याने गेल्या काही दिवसांपासून औषधं घेणं सोडून दिले होते… हल्ली सुशांत माझ्याशी खूप कमी बोलत होता …  पोलीस अधिकारी : तुमचे शेवटची भेट कधी झाली?  रिया : 6 जूनपर्यंत आमची भेट होत होती… त्या दिवशी तो नैराश्यात होता आणि त्याने मला त्याला सोडून एकटे राहण्यास सांगितले … मी एकही प्रश्न न करता त्याच्या अपार्टमेंटमधून निघून गेले… कदाचित काही दिवसात हे सगळं ठीक होईल असा विचार करुन मी तेथून निघून गेले…  त्याने स्वत:ला वेळ दिला पाहिजे स्वत: साठी विचार केला पाहिजे… म्हणून मी तिथून निघून गेली… आणि त्यानंतर अचानक 14 जूनला सुशांतच्या आत्महत्येबद्दल कळलं…  पोलीस अधिकारी : सुशांतच्या आत्महत्ये मागे काय कारण असावं?  रिया : काहीच सांगू शकत नाही… कारण तो कधीच काही शेअर करायचा नाही  पोलिस अधिकारी : सुशांत सिंगच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल काय सांगशील? म्हणजे तो कोणत्या प्रॉडकशन हाऊस सोबत काम करायचा? कोणाशी करत होता?  रिया: सुशांत ने यश राज फिल्मस सोबत काम केलं आहे… 2013 मध्ये डायरेक्टर महेश शर्मांच्या “शुद्ध देशी रोमांस”, 2015 मध्ये डायरेक्टर दिबाकर बॅनर्जी यांच्या “डिटेक्टिव्ह ब्योंकेश बक्क्षी“ आणि यश राज फिल्मस बॅनरचा तिसरा चित्रपट “पाणी” जो शेखर कपूर डायरेक्टर करणार होते पण यश राज फिल्मस ने अचानक या सिनेमातून माघार घेतली… सुशांत सोबतचा करार देखील यश राज फिल्मसने संपुष्टात आणला ही गोष्ट तशी जुनी आहे…  दरम्यान, रियाच्या या जबाबानंतर मुंबई पोलिसांनी यश राज फिल्म्सला एक पत्र लिहिले असून सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत यश राज फिल्मने केलेल्या कराराती प्रत पोलिसांनी मागवली आहेत. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या