JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / घाटकोपरमध्ये अग्नितांडव, कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

घाटकोपरमध्ये अग्नितांडव, कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

घाटकोपरमधील (Ghatkopar) असल्फा (Asalfa) येथे कारखान्याला भीषण आग लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जानेवारी: घाटकोपरमधील (Ghatkopar) असल्फा (Asalfa) येथे कारखान्याला भीषण आग लागली आहे. असल्फा सुंदर बाग येथील डिसिलव्हा कपाउंडमध्ये एका कारखान्याला भीषण लागल्याची माहिती आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान ही आग आता आटोक्यात आली आहे. या आगीची झळ कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या घरांना बसली आहे. या आगीचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

आग लागलेल्या कारखान्यात काच आणि सोफा बनवण्याचं काम केलं जात. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या घटनास्थळावर 40 ते 50 जवानांकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. हेही वाचा-  VIDEO- इन्स्टा फिल्टरमुळे चक्रावली मीरा राजपूत ; Shahid Kapoor ने दिलं मजेदार उत्तर ज्या ठिकाणी ही आग लागली होती त्या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. तसंच असल्फा हा टेकडी असलेला भाग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या