JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / हातावर पोट असणाऱ्यांना आता  Parle G चा आधार, कंपनी वाटणार 3 कोटी पॅकेट्स

हातावर पोट असणाऱ्यांना आता  Parle G चा आधार, कंपनी वाटणार 3 कोटी पॅकेट्स

पार्ले बिस्कीट हे गरीबांचं खाद्य समजलं जातं. पार्ले कंपनीने मदतीला हात पुढे केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 मार्च :  देशभर 21 दिवसांच्या लॉकडाउनला आजपासून सुरुवात झालीय. या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचं आणी रात्री खायचं अशी उपजिविका करणाऱ्यांनी आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. अशा गरीब लोकांसाठी मदतीचं आवाहनही करण्यात येत आहे. त्या आवाहनाला प्रसिसादही मिळतो आहे. पार्ले बिस्कीट हे गरीबांचं खाद्य समजलं जातं. पार्ले कंपनीने मदतीला हात पुढे केले आहे. कंपनी ही पुढच्या तीन आढवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पॉकेट्सचं वाटप करणार आहे. दर आढवड्यात 1 कोटी अशा प्रकारे तीन आढवड्यात 3 कोटी पॅकेट्स देणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सरकारच्या मदतीने गरजू लोकांना याचं वाटप करण्यात येणार आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशातही भारतीय समुदाने मदतीसाठी हात पुढे केला आहे. महाभयंकर कोरोनाने हाहाकार माजला आहे. या विषाणूमुळे लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. लोक घरात असली तरी वैद्यकिय कर्मचाऱ्यांना मात्र दिवस-रात्र रुग्णांसाठी झटावे लागत आहे. डॉक्टर, नर्स सध्या तहान भुक विसरून काम करत आहेत. अशाच कर्मचाऱ्यांना मदत म्हणून शीख समुदयाने तब्बल 30 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी लंगार तयार केले. वाचा -  मुंबईहून जोधपूरचा रेल्वे प्रवास नडला, सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी कोरोना पॉझिटीव्ह न्यूयॉर्कमध्ये तब्बल 25 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं दिवसरात्र डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून 30 हजारहून अधिक खाद्यपदार्थांची पाकिटे येथील शीख समुदयाने तयार केली आहेत. न्यूयॉर्कमधील शीख सेंटरने घरापासून दूर असलेल्या सर्व लोकांसाठी लंगर तयार केले आहेत. या खाद्यपदार्थांची पाकिटे पॅक करण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरांकडे संपर्क साधला होता. त्यांच्या मार्फत लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले होती. महापौराच्या संमतीनंतर गेले दोन दिवस लोकांना खाद्यपदार्थांचे पॅकेट दिले जात आहे. वाचा - कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकण्याचा पंतप्रधान मोदींनी सांगितला मंत्र युनायटेड शीख या ट्विटर हॅडेलवरून लंगर तयार करतानाचा व्हिडीओ अपलोड केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच शीख बंधूंचे संपूर्ण जगात कौतुक केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या