JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / लसीकरणासाठी गेलेल्या शिक्षिकेवर काळाचा घाला; ट्रकला ओव्हरटेक करताना खड्ड्यात अडकली गाडी अन्...

लसीकरणासाठी गेलेल्या शिक्षिकेवर काळाचा घाला; ट्रकला ओव्हरटेक करताना खड्ड्यात अडकली गाडी अन्...

Road Accident in Kalyan: लस घ्यायला गेलेल्या एका शिक्षिकेवर काळानं घाला (Female teacher death in accident) घातला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 03 जुलै: सध्या देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर (Vaccination) भर देत आहे. लोकंही लसीकरण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत असून लस टोचून घेताना दिसत आहेत. अशातच लस घ्यायला गेलेल्या एका शिक्षिकेवर काळानं घाला (Female teacher death in accident) घातला आहे. लसीकरणासाठी जात असताना वाटेतील एका खड्ड्यात स्कुटी अडकल्यानं अपघात (Accident) होऊन त्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. संबंधित घटना कल्याण पश्चिम येथील असून मृत शिक्षिकेचं नाव दिव्या कटारिया असं आहे. मृत दिव्या कल्याण पश्चिम येथील रितू कॉम्प्लेक्समध्ये आपला पती राहुल कटारिया आणि कुटुंबीयांसोबत राहत होत्या. दिव्या यांना 23 जून रोजी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची होती. त्यामुळे त्या आपला दीर अर्जुन कटारियासोबत लस घ्यायला स्कुटीवरून जात होत्या. लस घेण्यासाठी जात असताना, स्कुटीमध्ये पेट्रोल नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे दोघं दीर-भावजय पेट्रोल भरण्यासाठी बापगाव येथील पेट्रोल पंपच्या दिशेनं जाऊ लागले. हेही वाचा- नवरा अन् मुलींचा चुकला काळजाचा ठोका; बाल्कनीतून उडी घेत विवाहितेची आत्महत्या दरम्यान पेट्रोल भरायला जात असताना, त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक केलं. पण पुढे असलेला खड्डा त्यांना दिसला नाही. पाणी साचलेल्या या खड्ड्यात दुचाकी गेल्यानं मागील चाक खड्ड्यात अडकलं व दीर आणि भावजय दोघंही रस्त्यावर पडले. यामध्ये दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. हेही वाचा- महिलेनं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन, PM मोदींना लिहिलं अखेरचं पत्र अपघात घडल्यानंतर दीर अर्जुन कटारिया यांनी त्वरित आपल्या वहिनी दिव्या यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी चार दिवस उपचार घेतल्यानंतर दिव्या यांची प्राणज्योत मालवली आहे. टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या