एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे.
मुंबई, 21 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्या प्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुजरातला पोहोचल्यानंतर खळबळ उडाली आहे. अखेर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्या प्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद वातावरण तयार झाले आहे. वर्षा बंगल्यावर बैठकीला जाणार आहोत, असं राऊत म्हणाले. शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात सगळे नेते संपर्कात आहे. महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेश पॅटर्न लागू करून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.पण महाराष्ट्रात हे होणार नाही. महाराष्ट्रावर घाव घातला जात आहे, पण शिवसेना तसं होऊ देणार नाही. शिवसेनेवर हल्ला करण म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी हे छळयंत्र सुरू आहे. शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. जे बाहेर पडले त्यांची अवस्था सर्वांनी पाहिली आहे. आईच दुध विकणारी औलाद शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे नावं मीडियात दाखवली जात आहे. त्यातील बरीच आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहे. संजय राठोड , प्रताप सरनाईक हे वर्षावर दाखल आहे, असं राऊत म्हणाले. जे आमदार सुरतमध्ये आहे त्यांची व्यवस्था भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी केली आहे. त्यांना गुजरातला का नेण्यात आलं, सुरतमध्येच का ठेवण्यात आले आहे. आणि ते कुणाच्या जवळ आहे हे सर्वांना माहिती आहे, असं राऊत म्हणाले.