JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ‘अजित पवार 5 दिवसांमध्ये पुन्हा कामाला लागतील’, आरोग्यमंत्र्यांनी दिली दादांची माहिती!

‘अजित पवार 5 दिवसांमध्ये पुन्हा कामाला लागतील’, आरोग्यमंत्र्यांनी दिली दादांची माहिती!

‘या काळात आरामाची गरज असते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. केवळ आरामासाठीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 ऑक्टोबर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अजित पवारांना Breach Candy Hospital मध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र दादांची प्रकृती नेमकी कशी आहे याबद्दल माध्यमांमध्ये चर्चा सुरू होती. त्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच पुढे सरसावलेत. दादांची प्रकृती उत्तम असून ते 5 दिवसांमध्ये पुन्हा कामाला लागतील असंही त्यांनी सांगितलं. टोपे म्हणाले, दादा हे कडक शिस्तीचे भोक्ते आहेत. त्यांना सर्व गोष्टी या व्यवस्थित व्हाव्यात असं वाटत असतं. त्यांचे सारखे दौरे आणि बैठका सुरू होत्या. ते सर्व काळजी घेत होते. मात्र तरीही त्यांना इन्फेक्शन झालंच. मात्र त्यांची प्रकृती चांगली असून काळजीचं कुठलंही कारण नाही. या काळात आरामाची गरज असते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे असंही ते म्हणाले. अजित पवारांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती त्यामुळे ते लगेच आयसेलोशनमध्ये गेले. त्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं ते पूर्णपणे पालन करत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलतांना अजित पवारांनी एकादा पत्रकारांच्या बुम माईक्सवरही स्प्रेही मारला होता. तर एका कार्यक्रमात माहिती देणारा व्यक्ती मास्क काढून माहिती देत असल्याने दादांनी त्याला मास्क घालायला सांगितलं होतं. ‘तुमचं अभिनंदन करायला मला लाज वाटते’; नितीन गडकरींचा पारा चढला तसेच कार्यक्रमांमध्येही गर्दी न करण्याच्या सूचना ते कायम देत होते. त्यामुळे दादांचा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे आयोजकांवरही दडपण येत असते. अजित पवारही कायम हँड ग्लोज घालूनच वावरत होते. मात्र कोरोना व्हायरसची बाधा नेमकी कशी होते हे अजुनही कळालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं हा सर्वोत्तम उपाय आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या