JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत ड्रग्ज तस्करांकडून NCB च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार; 5 अधिकारी जखमी, म्होरक्या अटकेत

मुंबईत ड्रग्ज तस्करांकडून NCB च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार; 5 अधिकारी जखमी, म्होरक्या अटकेत

Drugs Smuggling in Mumbai: काल रात्री NCB ने ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल 1 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

जाहिरात

काल रात्री NCB ने ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल 1 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात पोटातून अमली पदर्थांची तस्करी करणाऱ्या दोन विदेशी नागरिकांना अटक केल्यानंतर NCB ने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. काल रात्री NCB ने ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल 1 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. दरम्यान ड्रग्ज तस्कर टोळीकडून NCB च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात NCB चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. तर यातील एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. वाशी ते नवी मुंबई भागात ड्रग्ज तस्करीचं मोठं रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती NCB ला मिळाली होती. या माहितीच्या अधारे NCB च्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा संबंधित ठिकाणी छापा टाकला. पण ड्रग पेडलरनं पोलिसांनावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात NCB चे 5 अधिकारी जखमी झाले आहेत. तर एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. या कारवाईत NCB ने ड्रग्ज तस्कर टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी एक विदेशी निर्मितीचं हत्यार जप्त केलं आहे. हेही वाचा- बापरे! पोटातून 18 कोटींची कोकेन तस्करी; मुंबई विमानतळावरून दोघांना अटक, NCB ची मोठी कारवाई या कारवाईत एनसीबीनं जवळपास 1 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याबाबतची माहिती NCB चे संचालक समिर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ड्रग्ज तस्कर तिवरांच्या झाडांची मदत घेत फरार झाले आहेत.  अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या