मुंबई, 5 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमत्त भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. दादर येथील शिवाजी पार्क जवळच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात. मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाबासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या अनेक अनुयायांना त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येता आलं नाही. मात्र आता कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानंतर जगभरातून लाखो अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहेत. जगभरातून आलेल्या या अनुयायांचं मनोरंजन आणि समाजप्रबोधन करण्यासाठी अनेक भीमसैनिक शिवाजी पार्कवर उपस्थित असतात. यामध्ये गायक आणि वादक यांचाही समावेश असतो. अकोल्यातील शाहीर सुरेश गुलाबराव शिरसाट हे देखील आपल्या गायक, वादकांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या वाहतूकीमध्ये 3 दिवस बदल गेल्या दोन वर्ष करून असल्यामुळे चैत्यभूमीवर येण्यास मिळालं नाही. गेल्या २० वर्षापासून सुरेश या क्षेत्रामध्ये आहेत. ते कुठेही नोकरी करत नाही. गाण्यांमधून समाज प्रबोधनाचे काम ते करत असतात. आणि गाण्याच्या माध्यमातूनच उदरनिर्वाह करत असल्याचे सुरेश शिरसाट सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं? गौतम दशरथ अंभोरे हे आणखी एक भीम सैनिक वयाच्या अठरा वर्षापासून या क्षेत्रात नाल वादक म्हणून कार्यरत आहेत. ते दरवर्षी न चुकता चैत्यभूमी येथे येत असतात. गौतम हे जन्मतः अंध आहेत. ’ जन्माचा मी अंध आहे, कुणी निंदा करवंदा गीत गायनाचा माझा धंदा ’ असं माझं समाज प्रबोधनाच काम आहे. असं गौतम अंभोरे सांगतात.