'ही लोक एका कारमध्ये गेल्या काही दिवसांपासून घर आणि शाळेची रेकी करत आहे. जर तुम्ही यांना ओळखत असाल तर मला माहिती द्या'
मुंबई, 26 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीचे (ncb) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू करून धुरळा उडवून दिला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून मलिक यांच्या घराची काही जण रेकी करत असल्याचं समोर आलं आहे. मलिक यांनी काही फोटो ट्वीट करून तुम्ही यांना ओळखता का? असा सवाल केला आहे. नवाब मलिक ट्वीट करून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वेगवेगळे पुरावे देऊन खळबळ उडवून देत आहे. पण, आज मलिक यांनी काही इसमांचे फोटो ट्वीट केले आहे.
ही लोकं एका कारमध्ये गेल्या काही दिवसांपासून घर आणि शाळेची रेकी करत आहे. जर तुम्ही यांना ओळखत असाल तर मला माहिती द्या, असं आवाहन करत मलिक यांनी दोन व्यक्तींचे फोटो ट्वीट केले आहे. या फोटोमध्ये जी लोक आहे, त्यांनी माझ्याकडे यावं, त्यांना काही माहिती हवी असेल तर ती देण्यास मी तयार आहे, असंही मलिक म्हणाले. काय म्हणावं याला! हटके प्रपोज करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट धक्कादायक म्हणजे, मलिक यांनी ज्या व्यक्तींचे कारसह फोटो ट्वीट केली आहे. यामध्ये एक जण कार चालवत आहे तर दुसरा व्यक्ती हा मागे बसला आहे. या व्यक्तीकडे कॅमेरा असल्याचं फोटोतून दिसून आलं आहे. त्यामुळे या फोटोतील व्यक्ती कोण आहे, कुणाच्या सांगण्यावरून ही माणसं मलिक यांच्या घराबाहेर होती, असे अनेक प्रश्न निर्माण झाली आहे.