मुंबई, 24 मार्च : आज राज्यमंत्री मंडळाची बैठक संपल्यावर सभागृहातून सर्व अधिकारी बाहेर पडले आणि त्यानंतर फक्त कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच उपस्थितीत सर्व मंत्र्याशी महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेत अर्थातच भाजपकडून सातत्याने होत असलेल्या गंभीर आरोपांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. यावेळी राज्यमंत्री मंडळात सचिन वझे प्रकरण, परमवीर सिंग यांचे पत्र, रश्मी शुक्ल यांचे गुप्त पत्र आणि भाजपवरील आरोपांची मालिका या सर्व मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटणार हे निश्चित होते. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व शासकीय कामकाज पूर्ण झाल्यानंतर सर्व अधिकारी आणि सचिव यांना मंत्रिमंडळ बैठकीच्या हॉलमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची पुन्हा बैठक सुरू झाली. या बैठकीत गेल्या आठवडाभरात भाजपने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. भाजप आरोपांची राळ उठवत असेल तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भूमिका घ्यावी, याविषयी चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. त्याच बरोबर भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी यांच्याबाबत निर्णय घ्यावा याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. हे ही वाचा- राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना संजय राऊत यांची डिनर डिप्लोमसी कॅबिनेट बैठकीनंतर मंत्र्यांमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली ? ‘अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो.’ ‘फोन टॅप होत असतील तर कामं कशी होतील.’ ‘अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा.’ ‘देवेंद्र फडणवीस यांना उघडं पाडलं पाहिजे.’ ‘आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे.’ कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा इतर मंत्र्यांशी झालेला संवाद. अशोक चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री) - आपण काम कसं करणार, फोन टॅप होतात. असं होत असेल तर ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री - ‘आपण एकत्र लढलो पाहिजे’ ‘देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना उघडं केलं पाहिजे.’ आपण अधिका-यांना ओळखण्यात कमी पडतोय? अधिका-यांवर विश्वास ठेवायचा कसा? अनिल देशमुख - ‘माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. माझ्याकडून कोणताही पैशांचा व्यव्हार झाला नाहीये.’