मुंबई 9 नोव्हेंबर : अक्षय कुमार (Akshay Kumar)चा ‘हाउसफुल 4’ (Housefull 4) हा चित्रपट मागच्या महिन्यात रिलीज झाला. Box Office वर त्याची चर्चाही झाली. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षने एक अनोखा फंडा वापरलाय. तो फंडा आहे त्याने दिलेलं बाला चॅलेंज (#Balachallenge) हे बाला चॅलेंज सोशल मीडियावरही चांगलंच ट्रेंड होतंय. त्याच्या व्हिडीओनींही सोशल मीडियावर धम्माल केलीय. नेटकऱ्यांनीही त्याला प्रतिसाद देत आपल्या अकाउंट्सवर त्याचे व्हिडीओ पोस्ट केले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, सेनन, पूजा हेगड़े आणि कृति खरबंदा यांच्यासोबत त्यांची धम्माल मस्ती या चित्रपटात आहे.
या #Balachallengeचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. भारतीय क्रिकेट संघातला भुवनेश्वर कुमार हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो शिखर धवन आणि युझवेंद्र चलह यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
या बाला चॅलेंजचा एक 30 सेकंदाचा व्हिडीओ शिखरने आपल्या अकाउंटवर शेअर केलाय. चहल हा त्यांच्या समोर मोठा आवाज करतो. तो आज केल्याबरोबर शिखर हा सगळं विसरून असं काही तोंड करतो की सगळ्यांनाच हसू आवरत नाही. ही सगळी मंडळी एका हॉटेलमध्ये बसलेली दिसतेय. त्यामुळे त्यांच्या या धिंगा मस्तीने सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलंय. अक्षयच्या या बाला चॅलेंजच्या आवाहनानंतर अनेकांनी अनेक चित्र-विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले आहे.