JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

फडणवीस हे गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आणि नंतर ते बिहारमध्येही प्रचारासाठी गेले होते. गेले काही दिवस ते ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 ऑक्टोबर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Devendra Fadnavis tests positive for COVID19) फडणवीस यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करतो आहे. मात्र आता मी ब्रेक घ्यावा असं देवाला वाटत असेल. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून क्वारंटाईन होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन सांगितले की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.

फडणवीस हे गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आणि नंतर ते बिहारमध्येही प्रचारासाठी गेले होते. गेले काही दिवस ते ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर होते. सुरूवातीच्या टप्प्यात कोरोनाच्या आढाव्यासाठी फडणवीस यांनी विभागवार दौरे केले.  राज्याच्या सगळ्या भागात जाऊन त्यांनी हॉस्पिटल्सला भेटी देत  सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. नंतर मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं होतं त्यामुळे फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याची पाहणी केली. याच काळात त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर ते दोन वेळा बिहारमध्येही गेले होते. बिहारच्या दौऱ्यावर असतानांच महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे ते तातडीने राज्यात परत आले आणि दौऱ्यावर निघाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या