JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'बांगड्या' वक्तव्यावरून माफी मागा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका

'बांगड्या' वक्तव्यावरून माफी मागा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका

टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 फेब्रुवारी : राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. फडणवीसांनी शिवसेनेवर जी टीका केली होती त्यावरून आदित्य यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होतं त्यावरून आदित्य यांनी निशाणा साधलाय. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही असंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र तुम्ही भाषणात शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही अशी टीका केली होती. बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही.त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. आणखी काय म्हणाले होते फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारनं पहिल्या दिवसापासून सुरू केली. आम्ही लढून पुन्हा सत्तेत येऊ. आम्हाला आमच्या विश्वासघाताची चिंता नाहीये, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची आहे. तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे. पुण्यातील प्रोफेशनल डान्सर मौजमजेसाठी करायचा दुचाक्यांची चोरी, पोलिसांकडून अटक या पावसामुळे एखाद्याचा 18 वर्षांचा मुलगा गेल्यावर जसं वाटेल तसं पावसामुळे पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं आहे. आम्ही काळजीवाहू सरकार असताना शेतकऱ्यांना 10 हजार कोटी दिलेत. नवं सरकार आम्हाला मदत करेल असं शेतकऱ्यांना वाटलं. मात्र पूर्ण अधिवेशन झालं तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करु असं यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

मित्रांनी whatsapp वर ब्लॉक केलं म्हणून तरुणाची आत्महत्या, मुंबईतली घटना आम्ही जाहीरनाम्यात नसताना शेतकरी कर्जमाफी दिली होती. किमान समान कार्यक्रमातही हे आश्वासन दिलं पण शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सुरु केलं. याच दराने यांनी कर्जमाफी केली तर 460 महिने कर्जमाफीला लागतील. तितका काळ हे सरकार तरी राहील का? आज धानाच्या खरेदीत भ्रष्टाचार होतोय. मराठवाडा वॉटर ग्रीडला यांनी स्थगिती दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या