विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे.
मुंबई, २८ जून - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा आता नवीन अंक सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकल्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या ७ दिवसांपासून गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आज सातव्यादिवशी भाजपच्या गोटामध्ये कालपासून घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहे. खाजगी विमानाने मुंबईहुन दिल्लीला निघाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर नवी दिल्लीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहे.विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे वकिल महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत आहे. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे. दरम्यान,एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, ते काही परत आले नाही. त्याच दिवशी २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही. असाच प्रकार २०१९ झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळे उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली.