JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, पवारांच्या भेटीला फडणवीस 'सिल्वर ओक'वर!

राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, पवारांच्या भेटीला फडणवीस 'सिल्वर ओक'वर!

पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे : महाविकास आघाडी सरकारवर (MVA Goverment) एकदा ही टीकेची संधी न सोडणार भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी जोरदार टीका केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असं सांगण्यात आले आहे. शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप समोर येऊ शकला नाही.

मात्र, मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणावर राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले होते. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही 100 कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष चिघळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या