JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी, 4 जणांना अटक, 3 आमदार लागले होते गळाला!

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी, 4 जणांना अटक, 3 आमदार लागले होते गळाला!

मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला 100 कोटी रुपये मागण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

जाहिरात

मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला 100 कोटी रुपये मागण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जुलै : शिवसेनेत (shivsena) बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार (shinde government) स्थापन झाले आहे. 20 दिवस उलटून गेले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एक आमदाराला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी (mumbai police) उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. राज्यमंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदार प्रयत्न करत आहे. पण मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला 100 कोटी रुपये मागण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर आणखी 3 आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. मागील काही दिवसांनी हे चार भामट्यांनी आमदारांना गाठून मंत्रिमंडळात स्थान मिळवून देतो असे आमिष दाखवून 3 आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या भामट्यांनी आपण दिल्लीतून आल्याचे सांगितलं आणि वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे, अशी थापही मारली. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही, या आमदारांना फोन करून मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल र 100 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणीच केली. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावले होते. मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी 100 कोटी मागितले होते. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते. याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने रोपीला पकडले. या आरोपींची चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या आरोपींनी आणखी किती आमदारांना अशा प्रकार फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या