मुंबई, 24 मे: तौक्ते चक्रीवादळाने (cyclone tauktae) कोकण किनारपट्टीवर धुडगूस घातला होता. अनेक गावात शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. कोकणात किती प्रमाणात नुकसान झाले याबद्दलचा अहवाल कोकण विभागाने सादर केला आहे. एकूण 47 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर पंचनामे करण्यात आले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तौक्ते वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी याबद्दल अहवाल सादर केला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. याचे नुकसानहे सर्वाधिक 25 कोटी इतके आहे. तर शेतीचे 16 कोटी 88 लाखांचे नुकसान झाले आहे. मनुष्य हानी - 41 लाख पशुधन - 6 लाख घरगुती वस्तू नुकसान - 11 लाख घरांची पडझड - 25 कोटी जनावराचे गोठे - 34 लाख मत्या व्यवस्थित - 4 कोटी 84 लाख शेती नुकसान - 16 कोटी 48 लाख एकूण 37 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, पालघर ठाणे सर्व मिळून ही मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केला होता कोकणाचा दौरा दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. . रत्नागिरीत तौत्के चक्रीवादळानं नेमकं किती नुकसान झालं आहे, याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या. संपूर्ण आढावा घेऊन पीडितांना योग्य ती मदत केली जाईल. यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.