JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचला कोरोना, 24 तासांमधले हे आहेत COVID19चे अपडेट

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचला कोरोना, 24 तासांमधले हे आहेत COVID19चे अपडेट

आत्तापर्यंत आपत्कालीन विभागात 5 ऑपरेटर , 6 सुरक्षा रक्षक , 1 शिपाई आणि 1 कर्मचारी अश्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात

त्यामुळे सणा सुदीचे दिवस असले तरी बाजारात अनावश्यक गर्दी करू नका असा सल्लाही सरकारने दिला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 मे: मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. सगळ्या शहराला व्यापणारा कोरोना आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही पोहोचला आहे. त्यामुळे आज होणारी स्थायी समितीची बैठक रद्द करण्यात आली. आतापर्यंत महापालिका मुख्यालयातल्या 13 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष आ ब्बैठक रद्द करण्यात यावी अशी विनंती केली होती. आत्तापर्यंत आपत्कालीन विभागात 5 ऑपरेटर , 6 सुरक्षा रक्षक , 1 शिपाई आणि 1 कर्मचारी अश्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धारावीत आज 84 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 1145 एवढी झालीय. तर आतापर्यंत 53 जणांचा मृत्य झाला. माहीम मध्ये 14 तर दादरमध्ये 11 नवे रुग्ण आढळले. जी उत्तर विभागात 1471 रुग्णसंख्या तर एकूण मृत्यू 68वर गेले आहेत. राज्यात  1153 पोलीस करोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी  126 अधिकारी तर 1026 पोलीस कर्मचारी बाधित आहेत. त्यात 9 पोलीस वीरांचा मृत्यू झालाय. ( मुंबई 6, पुणे1, सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1) मांजरावरून झालं भांडण, सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच जमावाचा हल्ला ठाण्यात आज तब्बल ८३ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ठाण्यात एकूण रुग्णांची संख्या ९९६ वर गेली आहे. आतापर्यंत एकूण ४८ जणांचा ठाण्यात करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २७३ जणांनी ठाण्यात करोनावर मात केलीये कोरोनाविरोधी युद्धाची तयारी पाहण्यासाठी 80 व्या वर्षीही शरद पवार उतरले मैदानात पुणे शहरात दिवसभरात 106 रुग्ण सापडले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला. 144 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. एकूण बाधित 3093 वर गेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या