नवी मुंबई, 2 मे : मुंबईतील वांद्रे स्थानकावर काही दिवसांपूर्वी झालेल्या परप्रांतीय मजुरांच्या गर्दीची घटना ताजी असतनाच असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. नवी मुंबईच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मजुरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी ओढ घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या राज्यात जाण्यासाठी नोंदणी सुरू झाल्याचं कळताच या मजुरांनी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाकडे धाव घेतली. पोलिसांनी भावे नाट्यगृहात अर्ज भरा असं सांगितल्या या नागरिकांचं म्हणणं आहे. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. शेकडो नागरिक अर्ज भरण्यासाठी अजूनही रांगेत उभे आहेत. रेल्वे स्थानकावर विनाकारण गर्दी करू नका, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन आवाहान महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. हेही वाचा - पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा, आता शहरातच होणार कोरोनाची चाचणी त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही,तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.