अमित राय (प्रतिनिधी) मुंबई 04 एप्रिल : कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. असं असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचं थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचं समोर येत आहे. निजामुद्दीन मरकजमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी 10 लोकांपैकी 6 जण मुंबईतील धारावी परिसरात राहात होते. त्यापैकी चार लोक सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये वेगवेगळ्या भागांत 4 जण राहात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी 2 लोकांचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. अद्यापही हे दोन जण सापडू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा धोका वाढला आहे. धारावीमध्ये 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा व्यक्ती तबलिगी जमातच्या लोकांना भेटला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तबलिगी जमातचे 4 जण केरळमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. हे वाचा- दिवे लावण्यापेक्षा..,आव्हाडांनी केलं राज्यासाठी जनतेला ‘हे’ आवाहन धारावी आणि मुंबई कनेक्शन गेल्या काही दिवसांत धारवातील अनेक लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारवीची वेगळी ओळख आहे. याच धारवीमध्ये सफाई कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर आणखी एकाला कोरोनाची लागण आहे. सध्या धारावीतील अनेक चाळी, इमारती क्वारंटाइन केले असून मुंबईचा धोका वाढल्यानं प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात दिल्लीच्या निजामुद्दीन कार्यक्रमानंतर जवळपास 1400 लोक परतले होते. त्यापैकी सांगलीमधील 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरीही राज्यातील अनेक भागांमध्ये गेलेल्या तबलिगी जमातच्या लोकांना शोधून त्यांच्या चाचण्या करण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तबलिगी जमातचे हे 6 जण 23 मार्चच्या आधीपर्यंत धारावीत राहात होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 56 वर्षीय रुग्णालाही ते भेटले होते. असे आणखीन किती लोकांना भेटले होते याचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान अद्याप दोन जणांबाबत कोणतीही माहिती मिळू न शकल्यानं धारावीसह मुंबईचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हे वाचा- मुंबई पोलिसाने लिहिलं खळबळजनक पत्र, वडिलांच्या मृत्यूनंतर व्यवस्थेचा कटू अनुभव