JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मोठा दिलासा! आज राज्यातील 74,045 रुग्णांची कोरोनावर मात

मोठा दिलासा! आज राज्यातील 74,045 रुग्णांची कोरोनावर मात

Maharashtra Coronavirus news: राज्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या मोठी आहे.

जाहिरात

पुण्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81 टक्के एवढा आहे. चेन्नई, दिल्लीला मागे टाकत पुणे देशात नंबर वन झाले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल: राज्यात कोरोनाचा (Corona) उद्रेक सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आज राज्यात 66,836 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मात्र, त्याच दरम्यान दिलासा देणारी बातमी म्हणजे मोठ्या संख्येने रुग्णांनी कोरोनावर मात (Covid patients discharge) केली आहे. आज राज्यातील एकूण 74,045 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, असे असले तरी चिंता वाढवणारी बातमी म्हणजे राज्यात आज कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. राज्यात आज 773 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 360 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 224 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 189 मृत्यू हे एक आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52% एवढा आहे. आज 74,045 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 34,04,792 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.81 एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,51,73,596 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 41,61,676 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,88,266 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,376 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण राज्यात आज रोजी एकूण 6,91,851 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 1,16,602 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 81,174 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूरात 80862 सक्रिय रुग्ण तर ठाण्यात 77,793 रुग्ण आहेत. वाचा:  पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी केल्या या 5 मोठ्या मागण्या आज राज्यात 66,836 नवीन रुग्णांचे निदान आज निदान झालेल्या 66,836 नवीन रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे विभागातील आहेत. ठाणे विभागात 16,968 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे मंडळात 13,220 रुग्णांचे निदान झाले आहे. ठाणे मंडळ - 16,968 रुग्ण नाशिक मंडळ - 9,101 रुग्ण पुणे मंडळ - 13,220 रुग्ण कोल्हापूर मंडळ - 2,644 रुग्ण औरंगाबाद मंडळ - 3,338 रुग्ण लातूर मंडळ - 4736 रुग्ण अकोला मंडळ - 4006 रुग्ण नागपूर मंडळ - 12,823 रुग्ण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या