JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सावधान 'कोरोना व्हायरस'चा मुंबईला विळखा, 4 वॉर्ड अतिधोकादायक जाहीर

सावधान 'कोरोना व्हायरस'चा मुंबईला विळखा, 4 वॉर्ड अतिधोकादायक जाहीर

या सर्व भागांना सील करण्यात आलं आहे. त्या भागातून बाहेर जायला आणि प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात

Mumbai: Residents of Khar during a fumigation drive to prevent the spread of coronavirus during the nationwide lockdown, in Mumbai, Monday, April 6, 2020. (PTI Photo)(PTI06-04-2020_000148B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 07 एप्रिल : राज्य सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नानंतरही मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत आहे. दररोज नवे रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आता टेस्टिंगची संख्या वाढवली आहे. त्यामुळे जास्त रुग्ण सापडत आहे. ही संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने 4 हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. हे 4 हॉटस्पॉट 4 वॉर्ड्समध्ये आहेत. यात G दक्षिण म्हणजे वरळी कोळीवाडा,  प्रभादेवी या भागांचा समावेश होतो. तिथे आता 78  रुग्ण आहेत. त्यानंतर E वॉर्ड भायखळाचा समावेश होतो जिथे 48 रुग्ण सापडले आहेत. तर D वॉर्ड म्हणजे ताडदेव मध्ये 43 रुग्ण सापडले  आहेत. K वेस्ट म्हणजेच अंधेरी पश्चिममध्ये 40 रुग्ण आढळले आहेत. या सर्व भागांना सील करण्यात आलं आहे. त्या भागातून बाहेर जायला आणि प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये 40 पेक्षा अधिक रुग्ण आहेत त्या वॉर्डांना अतिधोकादायक वॉर्ड किंवा अतिसंवेदनशील भाग म्हणून ठारविण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज आणखी 10 रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहोचला आहे. लॉकडाऊनमध्ये थेट फेसबुकवर दारूच्या जाहिराती, पोलिसांनी नागरिकांना केलं हे आवाहन राज्यात आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा 23 ने वाढला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 10  रुग्ण वाढले आहे. तर पुण्यात 4 रुग्ण आढळले आहे. तर सांगली 1, बुलडाणा 2, ठाणे 1 आणि नागपूर 2  आढळले आहे.  राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसंच कॅबिनेट मंत्र्यांसोबत त चर्चा करणार आहेत. काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू होऊ शकतो ‘भीलवाडा मॉडेल’

धारावीत रुग्णांची संख्या वाढली दरम्यान, मुंबईतील धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. धारावीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. धारावीमध्ये आज नव्याने कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून हे दोन्ही रुग्ण धारावीतील बलिगा नगरमधील असल्याची माहिती आहे. याधी जी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती, तिच्या 80 वर्षांचे वडील आणि 49 वर्षांचा भाऊ या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

COVID-19 : गरिबांना मोदी सरकाराचा मदतीचा हात, आर्थिक साहाय्यासाठी 6,834 कोटी

धारावीमध्ये आता सापडलेल्या दोन रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे. यामध्ये बलिदान नगरमधील 4, वैभव अपार्टमेंटमध्ये 1 डॉक्टर, मुकुंद नगरमध्ये 49 वर्षाचा एक पुरुष आणि मदिना नगरमध्ये 21 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या