JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

मानापमानाबरोबरच, गर्दी आणि या खासदाराने वापरलेल्या वादग्रस्त शब्दामुळे नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा चर्चेत राहिला आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे. धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम मोदी हे लोकांना … बनवायचं काम करतात, अस वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. खासदार हे सर्व मंत्र्यांच्या आणि महिलांच्या उपस्थितीत हा वादग्रस्त शब्द वापरला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या पदग्रहण समारंभाच्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेस प्रमुख नेते उपस्थितीत होते. (Congress MPs tongue slipped) हे ही वाचा- धनंजय मुंडे प्रकरणाची पुन्हा चर्चा; भाजप नेत्याचा शरद पवारांना खडा सवाल काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? -आज आपल्या समोर अनेक आव्हानं आहेत. मोदी सरकार मनमानी काम करत आहे, त्याशिवाय केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. हा देशाच्या संविधांवर घाव आहे. चीनने लडाख मध्ये जमीन काबीज केली आता ते सोडायला तयार नाही. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे आव्हान आहे. या निमित्ताने भाजप पाळंमुळं काढली पाहिजे. कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे साथ आहोत. अशोक चव्हाण - - नाना पटोले यांना नवीन जबाबदारी सोपवली आहे - स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस झेंडा फडकत राहो ही शुभेच्छा - काँग्रेस आहे म्हणून हे सरकार आहे. काँग्रेस ध्येय घोरणे घेऊनच हे सरकार चालेल, अशोक चव्हाण यांचा महाविकास आघाडीतील इतक मित्र पक्ष यांना सूचक इशारा - बाळासाहेब थोरात यांनी कठीण काळात काम केलं. कोरोना काळ संकट असताना काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठका झाल्या. सभागृह आणि पक्षच काम केलं त्यांचे पण आभार मानले पाहिजे. नाना चिंता करू नका हे नेतृत्व एकट्याचे काम नाही सगळ्यांच काम आहे. राज्याच्या राजकारणात नाना पटोले यांच्या प्रवेशांनंतर मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच त्यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणतं नाना पटोले यांची अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या