JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'पोलिसांनी माझं फोन रेकॉर्डिंग ऐकवलं, तो आवाज माझाच होता', फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंचा मोठा दावा

'पोलिसांनी माझं फोन रेकॉर्डिंग ऐकवलं, तो आवाज माझाच होता', फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंचा मोठा दावा

राजकीय द्वेषापोटी आपला फोन रेकॉर्ड करण्यात आला, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : कथित फोन टॅपिंग प्रकरणी (Phone tapping case) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची आज चौकशी झाली. पोलिसांनी या प्रकरणी नाना पटोले यांचा जबाब नोंदवला. नाना पटोले यांनी चौकशीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चौकशीत पोलिसांनी काय विचारलं याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. अधिकाऱ्यांनी फोन टॅप केलेला जो आवाज आपल्याला ऐकवला तो आपलाच होता, हे नाना पटोले यांनी मान्य केलं. तसेच राजकीय द्वेषापोटी आपला फोन रेकॉर्ड करण्यात आला, असा दावा नाना पटोले यांनी केला. तसेच याबाबत कोर्टाच्या चार्जशीटमध्ये नोंद येणार, असंदेखील त्यांनी सांगितलं. नाना पटोले नेमकं काय म्हणाले? “DCP रँकच्या अधिकाऱ्यांनी माझा जबाब नोंदवला. माझं फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवलं. तो आवाज माझाच होता हे मी कबूल केलं. शेतकरी आंदोलन विषयक माझी भूमिका या फोन्स कॉलमध्ये होती. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाला विरोध यात स्पष्ट होत होता. राजकीय द्वेषापोटी माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येणार. ड्रग्जच्या धंदा करणारा अमजद खान असं नाव देऊन माझा कॉलचं रेकॉर्डिंग केलं. भाजपने पदाचा दुरुपयोग करुन हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. मी अमजद खान, तर आताचे जय-विरु हे राजकीय खलनायक आहेत. पण आता तपासातून रश्मी शुक्ला यांचा बोलविता धनी समोर येणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले. ( ‘‘सरकारनं OBC च्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली…’’, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप ) नाना पटोले यांचा ओबीसी आरक्षणावरुन फडणवीसांवर निशाणा दरम्यान, नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर ओबीसी आरक्षणावरुन आरोप केला. ते खोटे बोलताय आणि रेटून बोलतायत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस सरकारमुळे लागलं. ओबीसी आरक्षणासहित निवडणूका घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चीफ जस्टीस यांना भेटले. कायदेशीर बाबींवर चीफ जस्टीस काय भूमिका घेतात हे समजेल”, असं नाना पटोले म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरण नेमकं काय? भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला, असा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या