चित्रा वाघ यांचा पुन्हा एकदा चाकणकरांवर निशाणा
मुंबई, 6 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेदवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमने-सामने आल्या आहेत. उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यानंतर राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन पुन्हा एकदा चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांचे ट्विट काय आहे? “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला पाठवली आहे.”, असे म्हणत चित्रा वाघ यांनी पुन्हा महिला आयोगावर टीका केली आहे. पुढे त्या लिहतात, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार आहे. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. वाचा - उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचे आरोप चुकीचे, राज्य महिला आयोगानेच धाडली उलट नोटीस रुपाली चाकणकर यांनी म्हटलं? रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, तेजस्वीनी पंडितला पत्र पाठवल्याचा आरोप चुकीचा, राज्य महिला आयोगाने पत्र पाठवलं ते संजय जाधव यांना पाठवलं. जे अनुराधा या वेब मालिकेचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा या वेबसिरीजच्या प्रचारासाठी तेजस्विनीचे जे पोस्टर लावले आहेत त्यातून धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शनाचा संदेश समाजात जात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या वेबसिरिजचे दिग्दर्शक म्हणून तुमचा उद्देश आणि भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असून त्याबाबत तुमचे म्हणणे सादर करा अशी नोटीस पाठवली होती असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. राज्य महिला आयोगाच्या नोटीसीनंतर संजय जाधव यांनी त्यांची भूमिका मांडली. दरम्यान, आम्ही तेजस्विनी पंडितचा संबंधित पत्रात कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
चित्रा वाघ यांच्यावर तीन आरोप महिलेच्या पेहरावाबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत अप्रतिष्ठा होईल असं वक्तव्य केलं. तसंच राज्य महिला आय़ोगाच्या नोटीसीचा चुकीचा अर्थ काढून आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल असं वर्तन केलं आहे. दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणांची हेतुपुस्पर तुलना करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाने या प्रकऱणी खुलासा दोन दिवसात सादर करावा. अन्यथा तुमचे काही म्हणणे नाही असे समजून आयोगाकडून कारवाई केली जाईल असा इशारा राज्य महिला आयोगाकडून अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला.