मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला फक्त 35 आमदार उपस्थित; उर्वरित आमदार एकनाथ शिंदेंसोबत?
मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत (shivsena) भूकंप आला आहे. सेनेची अनेक आमदार अजूनही नॉट रिचेबल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे 35 आमदार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आणि शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यापाठोपाठ राज्यातील शिवसेनेचे आमदार नॉटरिचेबल झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले आहे. या बैठकीच्या निमित्ताने किती आमदार आपल्यासोबत आहे, याची गणना केली जाईल. संख्याबळ किती आहे, हे सिद्ध केलं जाईल. वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे 35 आमदार असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 शिवसेनेचे आमदार असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसंच एक अपक्ष आमदार सुद्धा शिंदेंच्या सोबत आहे. त्यामुळे एकूण संख्या 21 वर पोहोचली आहे. वर्षा बंगल्यावर दाखल आमदार ०१) वैभव नाईक ०२) दिवाकर रावते ०३) उदयसिंग राजपूत ०४) विनायक राऊत ०५) नरेंद्र दराडे ०६) अनिल देसाई ०७) विकास पोतनीस ०८) विनायक राऊत ०९) सुभाष देसाई १०) वरून सरदेसाई ११) अरविंद सावंत १२) किशोर दराडे १३) किशोर साळवी १४) आमशा पाडवी १५) चंद्रकांत रघुवंशी १६) रवींद्र वायकर १७) गुलाबराव पाटील १८) संजय राऊत १९) नीलम ताई गोरे २०) दादा भुसे २१) सचिन अहिर २२) सुनील शिंदे २३) संजय राठोड २४) सचिन पडवळ २५) अंबादास दानवे २६) मंगेश कुडाळकर २७) प्रकाश फातर्पेकर २८) राहुल शेवाळे २९) राहुल पाटील ३०) सुनील प्रभू ३१) दिलीप लांडे ३२) उदय सामंत ३३) राजन साळवी