JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता' भाजप आमदार प्रसाद लाड बरळले

'शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता' भाजप आमदार प्रसाद लाड बरळले

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर गेले".

जाहिरात

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर गेले"

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 डिसेंबर : महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भाजपमध्ये स्पर्धाच रंगली आहे. राज्यपाल कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, गोपीचंद पडळकर यांच्यापाठोपाठ आता आमदार प्रसाद लाड यांनीही भलतेच विधान केले आहे. शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य लाड यांनी केलं आहे. लाड यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्याबाबत एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला.

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर गेले”. असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे. (सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, ‘सत्तारांवर योग्य ती कारवाई करा’, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र) प्रसाद लाड यांच्या विधानामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रसाद लाड यांना चौथीच्या इतिहासाचे पुस्तक पाठवणार आहे. आज रविवार असल्यामुळे पोस्टल विभाग बंद आहे. उद्या त्यांना पत्र देणार आहे. शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे. रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. प्रसाद लाड यांनी जाणीवपूर्वक विधान केलं आहे. एकाने विधान करायचं आणि दुसऱ्याने सारवासारव करायचं हे खपवून घेणार नाही. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारी घेतली आहे का? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे. (भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा ) तर, प्रसाद लाड जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. भाजप आणि आरएसएस (RSS) ची मंडळी वारंवार बदनामी का करत आहे हे विकृत मानसिकतेचे मनुवादी आहेत. शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या