धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 7 फेब्रुवारी : चांगली नोकरी मिळवण्यासाठीच सर्वजण जास्तीत जास्त शिक्षण घेतात. उत्तम शिक्षण, सुरक्षित नोकरी हे सर्व सोडून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस काही जण दाखवतात. एमबीएचं शिक्षण घेऊन चहावाला बनलेला तरूण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचवेळी नवी मुंबईतील इंजिनिअर दुधवाल्यानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. केमिकल इंजिनिअर झालेला हा तरूण चक्क मसाला दुधाचा व्यवसाय करतोय. इंजिनिअर दुधवाला निलेश कडू असं या इंजिनिअर दुधवाल्याचं नाव आहे. तो नवी मुंबईतील कामोठचा राहणारा आहे. निलेशनं मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलंय. 2017 साली इंजिनिअर झाल्यानंतर त्यानं पाच वर्ष नोकरीही केली. त्यानंतर काहीतरी वेगळं करावं या उद्देशानं त्यानं कामोठे आणि खारघरमध्ये मसाला दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. निलेश फिरत्या गाडीवर गरम-गरम मसाला दूध, रबडी असे दूधाचे पदार्थ विकतो. त्यानं या व्यवसायाला देखील इंजिनिअर दूधवाला असं नाव दिलं आहे. मसाला दूध ही संकल्पना सध्या कमी होत आहे. दूध शरिरासाठी आवश्यक पदार्थ आहे. त्यामुळे मी हा व्यवसाय सुरू केला. माझ्या सध्या नवी मुंबईत दोन ब्रँच असून येत्या काळात नवी मुंबईतील अन्य भागासह मुंबईतही याचा विस्तार करण्याची माझी योजना आहे. ‘त्या’ घटनेनंतर सिव्हिल इंजिनिअरनं बदलली लाईन, कल्याणला पुरवतो फ्रेश मासे, Video किती आहे खर्च? निलेशनं त्याच्या गाडीवर मसाला दुधाचे फायदे देखील लिहिले आहेत. लहान मुलं, तरुण, वृद्ध व्यक्ती याबरोबरच आजारी व्यक्तीसाठी देखील हे दूध उपयुक्त आहे. गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारात हे दूध मिळते. रबडी 60 रुपयांपासून तर केसर मसाला दूध 80 रुपयांपासून मिळते.
’ हा व्यवसाय गाडी वगळता अगदी दहा हजार रुपयांमध्येही सुरू करता येतो. त्याचबरोबर एखाद्याची इच्छा असेल तर अगदी शून्य इन्व्हेस्टमेंटही याची सुरूवात करता येते. दिवसभरात 30 ते 40 लीटर दुधाचा वापर केला जातो. हे दूध थेट पुणे आणि सांगली जिल्ह्यातून येते. इंजिनिअरिंग सोडून सुरू केली Dairy, आता पगारापेक्षा अधिकची कमाई Video मसाला दूध तयार करण्यासाठी नऊ ते दहा प्रकारचे मसाले वापरण्यात येतात. खजूर आणि केसर हे महत्त्वाचे दोन पदार्थ या मसाला दुधामध्ये आहेत. मसाला दूध ही संकल्पना सध्या कुठेही पाहायला मिळत नसल्यामुळे मुंबई ठाणे पनवेल अशा विविध भागातून इंजिनिअर दूधवाल्याकडं नेहमी गर्दी असते.