शहरापासून दूर झोपडीमध्ये का राहतोय उच्चशिक्षित तरूण? पाहा

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गारमाळचा रहिवासी हर्षद थविल याने आपल्या शेतात रानझोपडी उभारली आहे. 

हर्षद थविल हा उच्चशिक्षित आहे त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे.

मात्र, त्याला शहरापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडत. त्यामुळे त्याने शेतात रानझोपडी  उभारली आहे. 

लहानपणापासूनच शेती-मातीत रमणाऱ्या हर्षदला डोळ्यांदेखत नष्ट होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती, आदिवासी दुर्गम भागातील झाडे टिकविण्याची चिंता वाटत असायची.

 याच मानसिकतेतून त्याने या दुर्मिळ कलमांची लागवडही रानझोपडीच्या आसपास केली आहे. 

 याशिवाय कॉफी, कोको, लिची, मंगोस्टोन, स्टार फ्रूट अशा विविध विदेशी वृक्षांच्या प्रजातींचीदेखील लागवड त्याने या परिसरात केली आहे.

त्याने आपल्या रानझोपडी मधील भिंतींवर विविध प्रकारची वारली पेंटिंग साकारली आहे.

त्यामुळे रानझोपडतील वास्तव्याला आता अनेक जण पसंती देऊ लागले आहेत.