JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / धक्कादायक! विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी; एक संशयित व्यक्ती सभागृहात?

धक्कादायक! विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी; एक संशयित व्यक्ती सभागृहात?

विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी समोर आली आहे.

जाहिरात

विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता कायदेमंडळ असलेल्या विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीमध्ये विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना एक अनोळखी व्यक्ती सभागृहात बसल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडलं? सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. गुरुवारी 9 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आलं. दरम्यान, एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीमध्ये विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना एक अनोळखी व्यक्ती सभागृहात बसल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने विधीमंडळ सुरक्षा यंत्रणेने तपास केला. त्यात एक संशयित व्यक्ती विधानपरिषदेच्या परिसरात फिरताना आढळला आहे. मात्र, संबंधित संशयित व्यक्ती विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू असताना बसली होती का? याचा शोध सुरू असल्याचे विधीमंडळ यंत्रणेने स्पष्ट केले आहे. वाचा - ‘आता तुमच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे..’ सभागृहात फडणवीस-खडसेंमध्ये कलगीतुरा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता सत्ता संघर्षावरून विरोधात आणि सत्ताधारी यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्याने हा संघर्ष आता आणखीन तीव्र झाला आहे. दरम्यान, एकमेकांवर सुरू आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. विरोधक सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशात आता आणखी एक मुद्दा विरोधकांना मिळाला आहे.

अधिवेशनाच्या पहिला आठवडा वादळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडा वादळी ठरला होता. विविध मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. हीच परिस्थिती दुसऱ्या आठवड्यातही पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन रक्कम देखील मिळाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या