JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्येही कोरोनाचं थैमान थांबेना? महाराष्ट्रातील आकडा आणखी वाढला

संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्येही कोरोनाचं थैमान थांबेना? महाराष्ट्रातील आकडा आणखी वाढला

हाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 116 वर गेला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मार्च : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संचारबंदी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र असं असलं तरीही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात सकाळी कोरोनाचे 5 रुग्ण आढळल्यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 116 वर गेला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सकाळी समोर आली आहे. त्यातच आता मुंबईत आणखी 4 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. आपल्या देशातून कोरोनाला पळवून लावण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आला. **हेही वाचा-** ‘मी घरी बसून मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका’ दरम्यान, एकीकडे कोरोनाग्रस्त नागरिकांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे कोरोनाच्या काही रुग्णांवर उपचार पूर्ण झाल्याची सकारात्मक माहितीही समोर आली आहे. देशातील पहिले ‘कौरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कौरोना’मुक्त होऊन घरी परतले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या