JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Valentine's Day पत्नीसोबत बाईकवर फिरणं विवेक ओबेरॉयला पडलं महागात; VIDEO VIRAL

Valentine's Day पत्नीसोबत बाईकवर फिरणं विवेक ओबेरॉयला पडलं महागात; VIDEO VIRAL

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरोयचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे विवेक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये विवेक आपल्या पत्नीसोबत बाईक वरून फिरताना दिसतो आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे विवेक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये विवेक आपल्या पत्नीसोबत बाईक वरून फिरताना दिसतो आहे. पण बायकोसोबत बाईकवर फिरणं विवेकला चांगलाच महागात पडलं आहे. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत विवेकने बाईक चालवताना हेल्मेट घातलेलं नाही. त्याचबरोबर विवेकने आणि त्याच्या पत्नीनेदेखील मास्क घातलेलं नाही. ही गोष्ट लक्षात येताच मुंबई पोलिसांनी तडकाफडकी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ट्राफिक पोलिसांनी विवेक विरुद्ध कलम 188 ,269 वाहन कायद्यानुसार कलम 177,129 अशा स्वरुपात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्याला 500 रुपयाच चलन सुद्धा कापलं आहे.

संबंधित बातम्या

Valentine day च्या निमित्ताने अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. विवेकलाही नियमांचं उल्लंघन केल्याने हा दिवस महागात पडला. विवेक आपल्या पतीनाला घेऊन रात्रीच्या वेळी मुंबईच्या रस्त्यावर बाईकने फिरत होता. अगदी फिल्मी पद्धतीने आपल्या ‘साथिया’ या चित्रपटच गाणं लावून हे सेलिब्रेशन चालू होत. तेच विवेकला महाग पडलं आहे.

(वाचा -  अखेर किमने कार्दीशियन पतिपासून विभक्त होणार, दाखल केला अर्ज! )

कोणताही आनंद व्यक्त करताना आपण एक नागरिक म्हणून या नियमांचं पालन करणं देखील तितकचं महत्वाचं आहे हे या प्रकरणावरून दिसून आलं. हा valentine day विवेक आणि त्याच्या पत्नीसाठी चांगलाच लक्षात राहील असंच म्हणाव लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या