मुंबई, 3 जानेवारी: मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या (Corona case load) आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron varient) वाढता प्रभाव, या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) इमारत सील ( Building seal) करण्याबाबत नवे प्रोटोकॉल (Revised protocols) जाहीर केले आहेत. यापूर्वी 1 मार्च 2021 ला पालिकेनं नियम निश्चित केले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक असल्यामुळे या नियमांत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. असे असतील नवे नियम एखादी इमारत किंवा इमारतीतील एखादी विंग यांच्यापैकी किमान 20 टक्के किंवा त्याहून अधिक फ्लॅटमधील नागरिक कोरोना बाधित असल्याचं आढळलं, तर ती पूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. या इमारतीत रुग्ण आणि इतर रहिवासी यांना कोरोनाबाबतच्या नियमावलीचं आणि होम क्वारंटाईनसाठीच्या सर्व निकषांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
सुधारित प्रोटोकॉल
कुठलीही गंभीर लक्षणं नसणाऱ्या मात्र चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना किमान 10 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. त्याचप्रमाणं सलग 3 दिवस ताप न येणं, हादेखील निकष लावला जाणार आहे. म्हणजेच 10 दिवसांचं होम क्वारंटाईन पूर्ण करण्यासोबतच सलग 3 दिवस ताप न येणं, हा निकषही लावण्यात आला आहे. हे सर्व निकष 4 जानेवारीपासून म्हणजेच मंगळवारपासून अंमलात येणार आहेत. हे वाचा -
सुधारित प्रोटोकॉलची यादी