JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई पालिकेच्या डोअर-टू-डोअर लसीकरणाचं High Court कडून कौतुक; म्हणाले, मोहिम योग्य दिशेनं सुरु

मुंबई पालिकेच्या डोअर-टू-डोअर लसीकरणाचं High Court कडून कौतुक; म्हणाले, मोहिम योग्य दिशेनं सुरु

मुंबई पालिकेनं (BMC) लसीकरणासाठी अनेक मोहिम राबवल्या. त्यातच डोअर- टू- डोअर (Door-to- door) मोहिमही पालिकेकडून राबवण्यात येत आहे.

जाहिरात

Bombay high court

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑगस्ट: मुंबईत (Mumbai )सध्या लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. मुंबई पालिकेनं (BMC) लसीकरणासाठी अनेक मोहिम राबवल्या. त्यातच डोअर- टू- डोअर (Door-to- door) मोहिमही पालिकेकडून राबवण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेचं आज मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) कौतुक केलं आहे. मुंबई महापालिकेची डोअर-टू- डोअर लसीकरणाची मोहिम योग्य दिशेनं सुरू असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या या मोहिमेवर न्यायालयानं आज समाधान व्यक्त केलं. राज्यातल्या या खासदाराच्या मुलीचा बालहट्ट पंतप्रधानांनी केला पूर्ण मुंबई पालिकेनंतर मीरा भाईंदर पालिकेनंही डोअर-टू-डोअर जाऊन ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुरु केलं आहे. याचं न्यायालयाकडून कौतुक करण्यात आलं. तसंच राज्यातल्या इतर पालिकेनंही मुंबई पालिकेप्रमाणं ही मोहिम राबवण्याची गरज असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे. आज मुंबई पालिकेनं न्यायालयात माहिती दिली की, डोअर-टू-डोअर लसीकरण मोहिमेतंर्गत अंथरुणांवर खिळलेल्या नोंदणीकृत एक चतुर्थांश ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 30 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत 4 हजार 889 पैकी 1317 नागरिकांना लस देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या