MUMBAI, INDIA - JULY 13: The recent heavy spell of showers has increased the problem of commuters as huge potholes have appeared on various roads in the city after rain under Andheri Bridge, on July 13, 2018 in Mumbai, India. Heavy rains made a comeback in Mumbai causing waterlogging in many parts of the city leading to disruptions in traffic services and affected local train services. (Photo by Satyabrata Tripathy/Hindustan Times via Getty Images)
अजित मांढरे, ठाणे 16 सप्टेंबर : युती होणारच असं एकीकडे युतीचे ज्येष्ठ नेते जाहीरपणे सांगत असताना, ठाण्यात मात्र रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. गेल्या चार वर्षात दोन्ही पक्षात फाटलेलं असताना अजुनही स्थानिक नेत्यांमधला दुरावा कमी झालेला नाही असं स्पष्ट झालंय. भाजपने कधी आदित्य ठाकरे यांना उद्घाघाट करण्यापासून रोखलं. तर कधी महापालिकेतल्या कारभारावरून शिवसेनेवर प्रहार केले. विधानसभेचे पडघम वाजले असताना शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय. रस्त्यांमधल्या खड्ड्यांवरून भाजपने शिवसेनेला टार्गेट केलंय. भाजपने आज ठाणे महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावरच शिवसेनेला खड्ड्यांवरुन टार्गेट केलं. भाजपने आर. जे. मलिष्का स्टाईल आंदोलन केलं. ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल, अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांचे झोल झोल, ठाणेकर तूला प्रशासनावर भरवसा नाय का? अशा शब्दात डिवचलंय. ठाण्यात यंदा पावसामुळे सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि ठाणे मनपा ने केलेल्या कामांची पोलखोल झालीये यामुळे ठाणेकर सोशल मिडायावरुन प्रशासन आणि नगरसवेकांवर टीका करतायेत. भाजपाने ही संधी वेधून शिवसेने विरोधात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हे आंदोलन केल्याने शिवसेना आणि भाजपा यांच्यात आलबेल नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
छगन भुजबळांवर शरद पवारांनी केला खुलासा राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत. राज्यभर फिरून कार्यकर्ते आणि नेत्यांशी ते संवाद साधत आहेत. याच मोहिमेवर पवार आज नाशिकमध्ये होते. नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. पवारांच्या प्रत्येक दौऱ्यात भुजबळ हे कायम त्यांच्यासोबत सावलीसारखे असायचे. मात्र आज भुजबळ दिसत नसल्याने त्यांच्या दौऱ्यात कायम तोच विषय चर्चेचा ठरला होता. भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोरात आहेत. त्यातच पवार नाशिकमध्ये येणार असल्याने ते दौऱ्यात असणं अपेक्षीतच होतं. त्यामुळे पवारांनाही भुजबळ का नाहीत असा प्रश्न विचारण्यात येत होता. शेवटी पवारांनीच त्यांचा खुलासा केला पण चर्चा व्हायची ती काही थांबली नाही.
पवार म्हणाले, माझ्या दौऱ्याची आखणी ही भुजबळांनीच केली होती. मात्र जागावाटपाची काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याने त्याची बैठक मुंबईत आहे. त्या बैठकीसाठी छगन भुजबळ मुंबईत थांबले आहेत. भुजबळांशी त्याबाबत चर्चा झाल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार, जयंत पाटील आणि भुजबळ हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचंही पवारांनी सांगितलं. भुजबळ नाशिकमध्ये का नाहीत याचा ते वारंवार खुलासा करत सर्व काही अलबेल आहे असं सांगत होते.