JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: भाजपा आमदाराच्या घराबाहेर सापडली चोरीची बॅग, काही दिवसांपूर्वीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 

VIDEO: भाजपा आमदाराच्या घराबाहेर सापडली चोरीची बॅग, काही दिवसांपूर्वीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 

भारतीय जनता पक्षाचे आमदार (BJP MLA) प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या निवास्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : भारतीय जनता पक्षाचे आमदार (BJP MLA) प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या निवास्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे. रविवारी पहाटे हा प्रकार घडला. या बॅगेत सोने,चांदी, पैसे आणि देवांच्या मूर्ती हा ऐवज होता. लाड यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. काय म्हणाले लाड? प्रसाद लाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, ‘पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला एक बॅग पडली आहे. मी पाहिलं त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅगा होत्या.पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस पथक आले. सोनं, चांदी, पैसे, मूर्ती हा ऐवज होता. माझ्या घराबाहेर 24 तास पोलीस संरक्षण असतं. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसला होता. त्यांनी त्याला हटकलं असता त्यानं ती बॅग टाकून पळ काढला. या प्रकराची घटना माझ्या घराबाहेर दुसऱ्यांदा घडली आहे. संरक्षण असताना या प्रकराची घटना घडणे योग्य नाही. बॅगेत ऐवज सापडला. त्यामध्ये दुसरं काही असतं तर घातपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्रीचं गस्तीपथ वाढवावं, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.’

संबंधित बातम्या

प्रसाद लाड हे काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मुंबई भाजपामधील प्रमुख नेते असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. ATM दुरुस्तीच्या नावाने आले अन् 22 लाख लुटून नेले! जीवे मारण्याची धमकी लाड यांना काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली होती. ‘एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून एका अज्ञात फोन नंबरवरून धमकीचे फोन येत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं लाड यांनी सांगितलं होतं. या प्रकारानंतर प्रसाद लाड यांनी पोलीस गुन्हे सहआयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या