JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / MLC Election UPDATES : पीपीई कीट घालून भाजप आमदार मतदानाला, फडणवीस स्तब्ध राहिले उभा, VIDEO

MLC Election UPDATES : पीपीई कीट घालून भाजप आमदार मतदानाला, फडणवीस स्तब्ध राहिले उभा, VIDEO

लक्ष्मण जगताप जेव्हा विधान भवनाच्या गेटवर पोहोचले तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस हे त्यांना घेण्यास पोहोचले होते

जाहिरात

लक्ष्मण जगताप जेव्हा विधान भवनाच्या गेटवर पोहोचले तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस हे त्यांना घेण्यास पोहोचले होते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून :  विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election) मतदान सुरू आहे. एक एक आमदाराचे मत हे प्रत्येक पक्षाला अत्यंत मोलाचे आहे.  भाजपचे पुण्यातील दोन आमदार हे आजारी आहेत. पण, दोन्ही  आमदारांनी येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (bjp mla laxman jagatap)  आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले. त्यानंतर पीपीई कीट घालून ते मतदानाला गेले. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेण्यासाठी गेटवर गेले होते. चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळात दाखल झाले.  लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक आहे. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी राज्यसभेला मतदानाचा हक्क बजावला होता. आज विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक रुग्णवाहिकेनं मुंबईत आले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक हे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

विशेष म्हणजे,  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मतदानाला येऊ नका असं सांगितलं होतं.  मात्र तरीही लक्ष्मण जगताप मतदानाला येण्यावर ठाम होते. लक्ष्मण जगताप दुपारपर्यंत मतदानाला पोहोचले. लक्ष्मण जगताप जेव्हा विधान भवनाच्या गेटवर पोहोचले तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस हे त्यांना घेण्यास पोहोचले होते. कोरोनाचा संसर्ग आणि त्यांची प्रकृती पाहता पीपीई कीट घालून लक्ष्मण जगताप हे मतदानाला पोहोचले होते. तर, दुसरीकडे भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या विधिमंडळात दाखल झाल्या आहेत. सकाळीच त्या पुण्यातून रवाना झाल्या होत्या. विधिमंडळात दाखल झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. तर खुद्द गिरीश महाजन यांनी व्हिलचेर ओढत नेऊन त्यांना विधान भवनात मतदानासाठी नेलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या