JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / एकीकडे मतदान सुरू असताना भाजपचा मोठा नेता पोहोचला अजितदादांच्या भेटीला, विधानभवनात खळबळ

एकीकडे मतदान सुरू असताना भाजपचा मोठा नेता पोहोचला अजितदादांच्या भेटीला, विधानभवनात खळबळ

दुपारी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले.

जाहिरात

दुपारी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election result)  मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्यात पोहोचली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप आपआपल्या आमदारावर खास लक्ष ठेवून आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे थेट राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी मतदान सुरू आहे. भाजपच्या आमदारांनी सकाळी पहिल्याच सत्रात मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर दुपारी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले. दोन्ही नेत्यामध्ये यावेळी चर्चा झाली. पण, चर्चेचा तपशील समोर येऊ शकला नाही. अजितदादांनी भेट घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मी अजित पवार यांची भेट घेतली. मात्र भेटीत कोणतीही राजकिय चर्चा केली नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही निरोप घेऊन गेलो नाही. मतदार संघातील कामांसंदर्भात अजितदादांशी संवाद साधला’ असं बावनकुळे म्हणाले. तसंच, माझ्या  मतदारसंघातील काम होतं, त्यामुळे त्यांच्याकडे गेले होते. मतदान संपलं आता राजकारण संपलं आहे. मी अजितदादांकडे विकासकामासाठी भेटायला गेलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं. फडणवीस आणि बाळासाहेब थोरात यांची भेट तर दुसरीकडे, भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक या विधानभवनात दाखल झाल्या होत्या. आजारी असतानाही मुक्ता टिळक या पुण्यातून मुंबईत दाखल झाल्यात. त्यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते गेले होते. त्यानंतर परत येत असताना वाटेत काँग्रेसचे नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि गृह आणि परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट झाली.

काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांना एकत्र येताना पाहून, फडणवीस म्हणाले की, चला काँग्रेसची तीन मतं मिळाली, असं म्हणताच उपस्थितीत नेत्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. पण तितक्यात सतेज पाटील यांनी ‘तो मी नव्हेच’ असं म्हणत सतेज पाटील यांनी फडणवीसांचा बाऊन्सर परतावून लावला. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी एकमेकांशी स्मित हास्य करून आपआपल्या मार्गाने निघून गेले. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, बावनकुळे यांनी याआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचीही गळाभेट घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या