JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी! उद्यापासून राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

मोठी बातमी! उद्यापासून राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

Vaccination for 30 to 44 year citizens: राज्यातील 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला 19 जून पासून सुरुवात करण्यात येत आहे.

जाहिरात

नोव्हेंबर महिन्यात पायझर या कंपनीने लहान मुलांना कोरोना लसीने कोणतही नूकसान होणार नाही अशी घोषणा केली आहे. मात्र कंपनीने हेही स्पष्ट केलं आहे की, गर्भवती महिलांवर कोरोना लसीच परिक्षण करण्यात आलेलं नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच 19 जूनपासून राज्यात (Maharashtra) 30 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. शनिवारपासून 30 ते 44 वयोगटातील (vaccination of citizens age group of 30 to 44) नागरिकांना उद्यापासून कोविड प्रतिबंधक लस (Covid Vaccine) देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी माहिती दिली आहे की, 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होत आहे. यासोबतच 44 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचेही लसीकरण सुरुच राहणार आहे. 30 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांनी कोविन अ‍ॅपवर पूर्व नोंदणी करावी असंही सांगण्यात आलं आहे. कोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण? केंद्र सरकारने सर्व राज्यांना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच या लसीकरणाच्या संदर्भात सर्व स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा आरोग्य केंद्रांनाही कळवण्यात आले आहे. शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यासाठी कोविन अ‍ॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात .येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या