मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचा(Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनऐवजी (maharashtra lockdown ) कडक निर्बंध लावले जाणार आहे. पण, कडक निर्बंध लावत असताना औरंगाबादप्रमाणे शनिवार ते सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात कडक निर्बंध लागणार हे जवळपास आता स्पष्ट झालं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन न लागू करण्याचा सूर लगावला आहे. त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंत्र्यांनी केली. औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे संचारबंदी लागू असते. त्याच धर्तीवर राज्यात लॉकडाऊन केला जावा, असा सूर कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांनी लगावला आहे. त्यामुळे राज्यात शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन राहील त्यात बहुतेक सर्व बंद राहील. तसंच, एसटी बस बंद न करण्याचा निर्णय घ्यावा, परंतु, उभे राहून प्रवास करू नये, असे नियम केले जाण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, मॉल्स, रेस्टारंट, बार पूर्ण बंद करून पार्सल सुविधा सुरू ठेवावी, अशीही चर्चा या बैठकीत झाली. शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल पण लसीकरण सुरू राहणार आहे. खासगी चारचाकी वाहन प्रवास यात जितके सिट त्यापेक्षा निम्मे सीट प्रवास करू शकणार आहे. याबद्दल आज रात्री नियमावली प्रसिद्ध केली जाईल. ती संपूर्ण राज्यासाठी असणार आहे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये 5 एप्रिल ते 18 एप्रिल किंवा 30 एप्रिलपर्यंत असे कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला आहे. लॉकडाऊन न करता कडक निर्बंध करावे असा सूर कॅबिनेट मंत्र्यांनी लगावला आहे. आमच्याविरोधात गुन्हा दाखल का केला? सोलापूरमध्ये फिर्यादीवर प्राणघातक हल्ला तसंच जिल्हा बंदी करू नये, अत्याआवश्यक सेवा, उत्पादन निर्मिती व्यवसाय चालू ठेवावे, हॉटेल्स मॉल्स पूर्ण वेळ बंद करता येईल का या विषयावर कॅबिनेट मंत्री चर्चा करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, मागील वर्षात झाल्या प्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन आता नको ही भूमिका कॅबिनेट बैठकीत काही मंत्र्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध नावाखाली नियमावली करण्याची भूमिका कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांनी मांडली आहे. 12 आणि 10 परीक्षा कालावधीत कोरोना वाढला तर भविष्यात तसा पुढे निर्णय घ्यावा लागेल. काही राज्यात कोरोना वाढला तिथे परिक्षा पुढे ढकल्या पण परीक्षा घेतल्या गेल्या, जसा कोरोना वाढतो तसा पुढे निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील.