JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'बाबरी जिंदा है' राम मंदिर भूमिपूजनावर असदउद्दीनओवेसींचं वक्तव्य

'बाबरी जिंदा है' राम मंदिर भूमिपूजनावर असदउद्दीनओवेसींचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वीच ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्यावर प्रश्न उपस्थितीत केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 ऑगस्ट : अयोध्येत राम मंदिराचे आज भूमिपूजन पार पडणार आहे. देशभरात भाजपकडून ठिकठिकाणी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. असदउद्दीन ओवेसी यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्ताने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आणि पुढेही राहील’ असं मत व्यक्त केले आहे. ओवेसी यांनी या ट्वीटसोबत जुन्या बाबरी मशिदीचा आणि बाबरी मशीद पाडण्याचा फोटोही ट्वीट केला आहे.

संबंधित बातम्या

काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्यावर प्रश्न उपस्थितीत केला होता. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने मंदिराच्या भूमिपूजनला जाणे हे त्यांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन आहे, अशी भूमिका मांडली होती. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून अयोध्येच्या सोहळ्याला जात आहे की, वैयक्तिक कारण आहे, हे ही त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणीही ओवेसींनी केली होती. दरम्यान, आज दुपारी 12.30 वाजता अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येकडे रवाना झाले आहे. ठीक 12.30 वाजेच्या सुमारास भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात होणार आहे.  यावेळी 22 किलो 600 ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या वीटेवर प्रभू श्रीरामांचं नाव आणि भूमिपूजनाचा मुहूर्त लिहिण्यात आला असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्यानगरीत करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या