JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / इंधन दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं भाडंही वाढलं; पाहा नवे दर

इंधन दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं भाडंही वाढलं; पाहा नवे दर

येत्या काळात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यात पेट्रोल-डिजेलच्या वाढलेल्या किमतींमुळे संकटात वाढ होण्याचं चित्र आहे. परिणामी मुंबई एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचं भाडं 18 वरुन 21 रुपयांवर होणार असण्याची माहिती समोर आली आहे. तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Rickshaw and taxi fares increased) आज परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेट्रोल, डिजेलच्या किंमतीत वाढ होत आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेला याचा फटका बसत आहे. या इंधन वाढीच्या निर्णयावर रिक्षा व टॅक्सी चालकांकडून आंदोलन पुकारण्यात येणार होते. मात्र आता भाड्यात वाढ करुन दिल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना या फटका सहन करावा लागणार आहे. आधीच कोरोनाचं संकट त्यात पेट्रोल-डिजेल भाडेवाढीबरोबरच रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे वाढ केल्याने सर्वसामान्यांचा खिशाला फटका सहन करावा लागणार आहे. हे ही वाचा- VIDEO : मनसे पुन्हा आक्रमक; पुण्यातील प्रसिद्ध कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडतात की काय अशा वेगाने वाढत आहेत. (Rickshaw and taxi fares increased) अनेक शहरांत पेट्रोल शंभरीला पोहोचलं आहे. एका बाजूला इंधनाच्या वाढत्या किमतींवरून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत असताना कच्च्या तेलाचे दर का वाढत आहेत याचं स्पष्टीकरण मोदी सरकार द्यायचा प्रयत्न करत आहे. यावर थोडा दिसाला म्हणून काही राज्यांनी करात घट करत पेट्रोलचे भाव काही प्रमाणात आटोक्यात ठेवायचा प्रयत्न सुरू केला आहे. पण हे भाग्य ज्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यांच्याच नशिबी आलं आहे. महाराष्ट्रात मात्र तसं चित्र दिसत नाही. पेट्रोलचा भाव सर्वाधिक असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या